Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले …
    राजकारण

    गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले …

    editor deskBy editor deskDecember 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशातील भाजपने गुजरातमध्ये निवडणूक एकतर्फी केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे तर यावर ठाकरे गटातील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, गुजरातचा निकाल हा अपेक्षित असून, तिकडे जर ‘आप’सह इतर पक्षांनी युती करून भाजपविरोधात निवडणूक लढवली असती, तर नक्कीच “काँटे की टक्कर” द्यावी लागली असती. पण, दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा, असे काहीतरी झाले असावे अशी लोकांच्या मनात शंका आहे, असे म्हणत आम आदमी पार्टी आणि भाजपचे साटेलोटे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
    आज हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, देशात तीन महत्वाची निवडणुका झाल्यात. त्यात दिल्ली महानगरपालिका तिथे भारतीय जनता पक्षाची 15 वर्षाची सत्ता आम आदमी पार्टीने खेचून घेतली. मतविभागनी झाली नसती, तर ‘आप’ला आणखी चांगल्या प्रकारे निकाल घेता आला असता, पण तरीही दिल्लीत मिळालेला कल हा कौतुकास्पद आहे. दिल्लीमध्ये 15 वर्षाची सत्ता भाजपसारख्या पक्षाकडून खेचून घेणे सोपे काम नाही.

    पुढे राऊत म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस चांगल्या प्रकारे लढत देत असून, हे चित्र आशादायी आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले असून दिल्ली हातून गेली आहे. हिमाचलमध्ये भाजपला संघर्ष करावे लागणार असून तिथे काँग्रेस जिंकणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधल्या विजयाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो. त्याबरोबरच दिल्लीच्या विजयासाठी आपला देखील शुभेच्छा. हिमाचलसाठी काँग्रेसचे कौतुकच करावे लागेल. आगामी निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. अहंकार दूर ठेवून विरोधी पक्ष सोबत लढला तर 2024 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.