धरणगाव : प्रतिनिधी
तालूक्यातील धानोरे येथील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन सरपंच भगवान आसाराम महाजन यांनी या सप्ताहाचे आयोजन केले असून तर दि ८ रोजी सप्ताह सांगतेला जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभली. यावेळी कीर्तनकार ह.भ.प.गोविंद महाराज पंढरपूरकर यांच्या काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना पालकमंत्री पाटील हे त्यांच्या कीर्तनात मंत्रमुग्ध झाले होते.
यानंतर ह.भ.प.महाराज यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाटील यांनी सरपंच भगवान महाजन यांनी आयोजित केलेला धार्मिक कार्यक्रम तालुक्यातील भाविकांसाठी मोठी मेजवानी असल्याचीही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. विहिरीला पाणी लागले कि पाणी भरत असते तसे भगवान महाजन यांचे कार्य सुरूच असते, त्यांनी जितके कार्यक्रम केले ते जनतेसाठी केले. त्यामुळे त्यांना भविष्यात कुठलीही कमी देव पडू देणार नाही असेही पालकमंत्री पाटील यांनी आवर्जून सांगतिले.
५० खेड्यातील भाविक नियमित कीर्तनात !
धरणगाव तालुक्यातील धानोरा येथे होत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात तालुक्यातील ५० गावातील भाविक भक्त या कीर्तनाचा आस्वाद घेत आहेत. भक्तीमय वातावरणात ते तल्लीन होत असल्याचे एका भाविकाने सांगतिले.
राजकारणापलीकडचे पालकमंत्री !
जिल्ह्यातील राजकारणातील दुध संघाची निवडणुकीत अंतिम टप्प्यात येवून पोहोचलेली असतांना जिल्ह्यातील सर्वच राजकीय मंडळी एकमेकावर कुरघोडी करीत असतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मात्र जिल्ह्यातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावून जिल्ह्यातील जनतेसोबत वेळ घालवत असल्याचेहि या निमित पाहायल मिळत आहेत. निवडणूकीची धामधूम सुरु असतांना देखील पालकमंत्री जनतेला प्राधान्य देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.