Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला कौदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न
    क्राईम

    जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिला कौदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : कौटुंबिक नैराश्यातून जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे (वय ५०) या महिलेेने केला.धक्कादाकय घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.

    जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात भारत राजा चावरे या मुलासह अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत.न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली.  याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा मुरलीधर भोम्बे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता चावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.