• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

editor desk by editor desk
December 7, 2022
in क्राईम, जळगाव
0
भरधाव वाळू ट्रॅक्टरने चार वाहने उडवली ; दोन जखमी !

जळगाव :प्रतिनिधी 

शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदी येथून वाळू वाळूचा उपसा करुन शहरात येत असलेल्या ट्रॅक्टर हे कारवाईच्या भितीपोटी चालकाने भरधाव वेगाने हाकत असतांना पुढे चालणार्‍या तीन ते चार वाहनांना उडविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी खोटे नगर जवळील वाटीका आश्रमजवळ घडली. यामध्ये पाच दुचाकीस्वार जखमी झाले असून तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाल्याने पोलिसांन ट्रॅक्टर जप्त केले आहे.

गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. नदीपात्रात महसूल किंवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जाताच वाळूचे डंपर किंवा ट्रॅक्टर कारवाईच्या भितीपोटी भरधाव वेगाने वाहने चालवितात. मंगळवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रातून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगावकडे येत होते. याचवेळी पोलिस ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असल्याचे समजताच कारवाईच्या भितीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवित होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तर एक कार वाहनावर जावून धडकली. ट्रॅक्टरचालकाने वाहनांना धडक दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. दरम्यान, आपल्याला मारहाण होईल या भितीपोटी ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टर जमा केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. महामार्गावरुन जात असलेल्या जावेद शेख अजीज (वय-28, रा. पाळधी) या युवकाला ट्रॅक्टरने धडक दिली. त्यानंतर त्याच्या पुढे असलेल्या ज्ञानेश्वर ठोसरे (वय- 23, रा.खोटे नगर) याला देखील ठोकले. भरधाव वेगाने वाहन चालवित असलेल्या वाहनाने दोघ युवकांना धडक दिल्याचे बघताच रामकृष्ण मराठे (वय- 50, रा.खोटेनगर) यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला उतरवून घेतले. परंतु तरी देखील ट्रॅक्टर चालकाने त्यांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने मराठे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने बचावले. वाहनांना धडक दिल्यानंतर पुढे अजून काही वाहनांना ट्रॅक्टर चालकाने उडविले. यामध्ये कारचालकाला धडक दिली असून त्याच्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

पथराड खुर्द सरपंचपदी सुनंदाबाई निकुंभ बिनविरोध !

Next Post

शंभूराज देसाई यांनी केली संजय राऊतांवर विखारी टीका !

Next Post
शंभूराज देसाई यांनी केली संजय राऊतांवर विखारी टीका !

शंभूराज देसाई यांनी केली संजय राऊतांवर विखारी टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group