जळगाव प्रतिनिधी: रविवारी सकाळी रस्त्यावर मुलांनी बापाचा खून केला तर दुसऱ्या दिवशी ही शहरातील जुने जळगावातील रथ चौकाच्या शेजारील आंबेडकर नगरातील आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोकं ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासला सुरवात झाली आहे
शहरातील महत्वाच्या परिसर असलेला जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे राजू पंडित सोनवणे वय-५५ यांचा ३० वर्षांपूर्वी रजिया सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. १५ वर्षांपासून दोन्ही पती-पत्नी आणि २ मुले असे लक्ष्मी नगरात स्थायिक झाले होते.राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते घरीच होते. आंबेडकर वाड्यासमोर राजू सोनवणे यांची आई व पुतण्या राहत असल्याने ते त्यांना भेटायला येत होते. रविवारी रात्री देखील ते आईला भेटायला आले आणि रात्री तिथेच थांबले.रात्री राजू यांची आई द्रुपदाबाई आणि पुतण्या विशाल अनिल सोनवणे असे घरी होते. राजू सोनवणे रात्री घराच्या वरील मजल्यावर झोपायला गेले तर आई व पुतण्या खालील खोलीत झोपले होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजले तरी राजू सोनवणे खाली न आल्याने त्यांनी एक मुलाला वर पाठविले असता त्याला घडलेला प्रकार लक्षात आला. राजू सोनवणे यांचे डोकं ठेचून हत्त्या करण्यात आली असून घटनास्थळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, परिस जाधव यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीही घटनास्थळाला भेट दिली. शेवटचे वृत्त आली तोपर्यंत पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यासह गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी मयत राजू सोनवणे यांची आईसह कुटुंबियांना मन हेलावणारा आक्रोश केला होता. घटनेची माहिती वार्यासारखी पसरल्याने याठिकाणी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. मयत राजू सोनवणे हे जळगाव जिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. मात्र दोन ते तीन महिन्यांपासून घरीच होते. राजू सोनवणे यांचा पंचमुखी हनुमान नगर परिसरातील लक्ष्मीनगर येथील रझिया यांच्यासोबत प्रेमविवाह झालेला होता. मयत राजू सोनवणे यांच्या पश्चात आई द्रौपदाबाई, मुलगा बाळा, दोन विवाहित मुली, तसेच चार भाऊ असा परिवार आहे.