धरणगाव : प्रतिनिधी
ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता केंद्र व राज्य शानच्या योजनांची प्रत्यक्ष अमलबजावणी ग्रामपंचायत करत असते. ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा दुवा असून गावाचा विकास हा गाव भूमिकेवर अवलंबून असतो. यासाठी गावाचा अभिमान बाळगून काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहून एकजुटीने गावाचा सर्वांगीण विकास साध्य करावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नागरिकांसाठी रस्ते, वीज व पाणी देण्याच्या कामांना गती दिली असून अंगात मंत्री पद येऊ दिले नाही. असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते तालुक्यातील अनोरे येथे ग्रामपंचायत कार्यालय व पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.*
अशी असेल पाणी पुरवठा योजना
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा उद्भव विहीर, गावापासून 2.5 किमी अंतरावर पाईपलाईन ,पंप हाऊस, 5 HP चे साहित्यासह सब मर्सिबल पंप व 1 सोलर पंप , 50 हजार लिटरची पाण्याची टाकी व गाव अंतर्गत पाईपलाईन या योजनेसाठी 73 लक्ष 60 हजार एवढा निधी मंजूर असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच नवीन ग्रामपंचायत कार्यालय (22 लक्ष), 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरन (10 लक्ष), गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (10 लक्ष) या कामंचे लोकार्पणही करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच स्वप्निल महाजन, उपसरपंच रूपालीताई पाटील, ग्रामसेवक प्रवीण पाटील, ग्रा.पं. सदस्य अधिकार पाटील, मनीषाताई महाजन, चित्राबाई पाटील, मंगलाताई गायकवाड, कल्पनाताई कापडणे, एकनाथ पाटील यांच्यासह धानोरा सरपंच भगवान महाजन, भानुदास पाटील, गारखेडाचे भास्कर पाटील चिंचपूर येथे कैलास पाटील आदी सरपंच, यांच्यासह गावातील मिलिंद पाटील, रमेश महाजन, संतोष चौधरी, मधुकर देशमुख, राजाराम महाजन आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. महाले सर यांनी केले प्रस्ताविकात सरपंच स्वप्निल महाजन यांनी गाव विकासाची भूमिका विशद केली तर हरिभाऊ महाजन यांनी आभार व्यक्त केले.