जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एकाचे लग्न लावून देण्यासाठी बेळगाव येथील एका इसमाने शहरातील व्यक्तीकडून तब्बल लाखो रुपये उकड्ल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ४६ वर्षीय इसम शहरात फरसाण विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. दि २१ एप्रिल २०२२ रोजी संशयित आरोपी प्रकाश सोनी रा.बेळगाव हा त्यांच्या फरसाणच्या दुकानावर येत याने फिर्यादी व्यक्तीचे विवाह करून देण्याचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व फोनपे च्या माध्यमातून घेत २ लाख ६१ हजार रुपये घेतले त्यानंतर त्या संशयिताने त्यांचे लग्न सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ३३ वर्षीय महिलेशी लावून दिले पण ती काही दिवसात संसार न करता पळून गेल्याने संशयित आरोपी प्रकाश सोनी रा.बेळगाव याच्या सह एक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा शनिपेठ पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी.रमेश चव्हाण हे करीत आहेत.