• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील अपघातात दोन मित्र ठार ; गाड्याचा झाला चुराडा !

editor desk by editor desk
December 6, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील अपघातात दोन मित्र ठार ; गाड्याचा झाला चुराडा !

जळगाव : प्रतिनिधी 

पोट भरण्यासाठी नेहमी शहरात येवून दिवसभर पेरुची विक्री करुन दुचाकीवर घराकडे परतणार्‍या दुचाकीस्वारांना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या कारने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील हनुमान मंदिराजवळ घडली. या अपघातात रफिक हुसेन मेवाती (वय-23),अरबाज जहांगीर मेवाती (वय-20) दोन्ही रा.राणीचे बांबरुड ता.पाचोरा या हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे रफिक हुसेन मेवाती व अरबाज जहाँगीर मेवाती हे दोघ कुटुंबियांसह वास्तव्यास होते. रफिक हा दररोज भावंडांसोबत जळगावात पेरु विक्री करण्यासाठी येत होता. दरम्यान, रफिकने मास्टर कॉलनीत दिवसभर पेरु विक्री करुन तो सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच 19 सीएच 4359) त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-21) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिरा जवळून दुचाकीने जात असताना पाचोर्‍याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 19 बीजे 2175) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोघ मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात एकाच गावातील दोघ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची कळताच दोघांच्या नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच यावेळी इतर दोन अपघातातील जखमींना आणल्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. पेरु विक्रेता रफिक मेवाती आई, वडील, तीन भाऊ आणि बहीसह वास्तव्यास होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. तसेच अरबाज याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.अपघातात कारच्या पुढच्या भागाचा पुर्णपणे चूराडा झाला होता. तर दुचाकी ही रस्त्याच्या कडेला पडलेली होती.

अरबाज हा हातमजूरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपुर्वी त्याने आयशर ही मालवाहू गाडी घेतली होती. त्यानिमित्त तो औरंगाबाद येथे गेला होता. काम आटोपल्यानंतर तो जळगावात आला आणि येथून अरबाज व रफिक हे दोघ मित्र घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दोघ मित्रांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Previous Post

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत

Next Post

अमळनेरात अधिकाऱ्यास लाच घेणे भोवले ; एससीबीने घेतले ताब्यात !

Next Post
अमळनेरात अधिकाऱ्यास लाच घेणे भोवले ; एससीबीने घेतले ताब्यात !

अमळनेरात अधिकाऱ्यास लाच घेणे भोवले ; एससीबीने घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group