• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वेब सीरिज बनवण्याच्या नावाखाली करत होते पॉर्न चित्रपट !

editor desk by editor desk
December 5, 2022
in क्राईम, राज्य
0
वेब सीरिज बनवण्याच्या नावाखाली करत होते पॉर्न चित्रपट !

मुंबई : वृत्तसंस्था 

परदेशी वेब सीरिज बनवण्याच्या नावाखाली स्ट्रगलर स्त्री कलाकाराला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराच्या तक्रारीनंतर निर्माता आणि दिग्दर्शक यास्मीन खानसह चार आरोपींविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या टोळीचा कारनामा उघडकीस आला आहे.

यास्मीन, अनिरुद्ध प्रसाद जंगडे, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे यास्मीन खानला दीड वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केली होती.

पॉर्न फिल्म बनवून इंटरनेटवर अपलोड
चारकोप परिसरामध्ये एक महिला स्ट्रगलर चित्रपटात काम शोधत होती. या दरम्यान तिला राहुल ठाकूर नावाच्या एका व्यक्तीने सिनेमात काम करण्यासाठी संपर्क करुन केशव नावाच्या व्यक्तीसोबत संपर्क करण्यास सांगितलं होतं. केशवने तिच्याकडे बायोडेटा आणि फोटो मागितले आणि राहुल पांड्ये नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितलं. तिने राहुल पांड्येशी संपर्क केल्यानंतर त्याने सांगितलं की वेब सीरिजमध्ये काम करावं लागेल आणि त्यात बोल्ड सीन देखील असतात. भारतात ही वेब सीरिज रिलीज होणार असल्याने तिने यास नकार दिला. ऑक्टोबर महिन्यात राहुल ठाकूरने या महिलेशी पुन्हा संपर्क केला. मोबाईल अॅपसाठी वेब सीरिज बनवत असूत ती परदेशात प्रदर्शित होणार आहे आणि त्यातही बोल्ड सीन आहेत. त्यावर या स्त्रीने काम करण्यास होकार दिला. यानंतर तिला अनिरुद्धला भेटायला सांगितलं. त्याने या स्त्रीला चारकोपमधील एका फ्लॅटमध्ये नेलं. तिथे एक महिला मेकअप आर्टिस्ट, यास्मीन, अनिरुद्ध आणि आदित्य होते. यास्मीनने स्वत:ला कॅमेरापर्सन असल्याचं सांगितलं. तर अनिरुद्ध आणि आदित्यला अभिनेते असल्याचं सांगितलं.

शूटिंगदरम्यान यास्मीनने महिलेला कपडे काढण्यास सांगितलं. परंतु तिने नकार दिल्याने यास्मीनने तिला 15 लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या स्त्रीने यास्मीनच्या भीतीने चित्रीकरण केलं. यानंतर 22 ऑक्टोबरला स्त्रीच्या परिचीत व्यक्तीने तिला तिचा व्हिडीओ अश्लील साईटवर अशल्याचं सांगितलं. यानतंर महिलेने यास्मीनला व्हिडीओ हटवण्यास सांगितलं. यावर यास्मीन खानने 25 हजार रुपयांची मागणी केली. मात्र नंतर तिने पीडितेचा फोन उचलणं बंद केलं. मग महिलेने या चार जणांविरोधात भांडुप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. ही घटना चारकोपला घडली असल्यामुळे हे प्रकरण चारकोप पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. तिच्या या तक्रारीवरुन पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Previous Post

राज्यात शिवशक्ती व भीमशक्तीचा नवीन प्रयोग ?

Next Post

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत

Next Post
प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीवर हल्ला ; दोन अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group