धरणगाव : प्रतिनिधी
जागतिक दिव्यांगदिनानिमित्त धरणगाव येथे पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया कार्यक्रमात धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार राजाराम देवरे यांचा अपंग बांधवासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबाबत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून अपंग बांधवांसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तहसीलदार देवरे यांनी अपंग बांधवांचे कोणतेही शासकीय काम असो ते अतिशय ततपरतेने केले असून कोरोना कालावधीत अपंगांना शिधावाटप,महाराजस्व शिबिराद्वारे रेशनकार्ड वितरण इ वाटप केले आहे. या कामाची दखल घेण्यात आली.याप्रसंगी पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील,प्र जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,अपंग महासंघाचे अध्यक्ष संजय पाटील व इतर अधिकारी हजर होते.
या ही अधिकाऱ्यांचा झाला सन्मान
नगरपरिषद मुख्याधिकारी जनार्दन पवार,बीडीओ शुशांत पाटील,पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचा देखील सन्मान करण्यात आला.
पुरस्काराने प्रेरणा मिळाली
या पुरस्काराने आंनद झाला असून अपंग बांधवांसाठी काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे.तालुक्यात सर्व अधिकारी अतिशय संवेदनशील असून समन्वय चांगला असल्याने अपंग बांधव,शेतकरी बांधव व सर्व नागरिकांची कामे आता तात्काळ होत आहेत.