Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तरुणावर रात्री चॉपर हल्ला !
    क्राईम

    जळगावात तरुणावर रात्री चॉपर हल्ला !

    editor deskBy editor deskDecember 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून यामध्ये नितीन निंबा राठोड (वय-24) व सचिन कैलास चव्हाण (वय-22) दोघ गंभीर जखमी झाले. यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरु आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहे. दरम्यान, या वादाच्या कारणावरुन रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये काही तरुणांसोबत आला.

    त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरसारख्या शस्त्राने वार केले. दरम्यान, नितीनवर वार होत असल्याचे समजताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार करुन जखमी करीत हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात नितीन राठोड हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.