Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हे फळ सालीसोबत खाल्यास होणार फायदे !
    आरोग्य

    हे फळ सालीसोबत खाल्यास होणार फायदे !

    editor deskBy editor deskDecember 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आपण नेहमी फळांच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न्न्न करीत असतो, संत्री हे फळ अनेकांना आवडते. संत्र्यांचा ज्युस पिऊन अनेक लोक दिवसाची सुरुवात करतात. संत्री हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक संत्री खाल्यानंतर त्याचे साल फेकून देतात.पण संत्रीचे साल न फेकता तुम्ही त्याचा वापर करु शकता. संत्रीप्रमाणेच संत्रीचे साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊयात संत्रीच्या

    सालाचे फायदे
    संत्रीच्या सालामध्ये असतात पोषक तत्वे
    फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते. संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते. तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर तयार करुन त्या पावडरमध्ये मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. हे मिश्रण पील ऑफ मास्कसारखे असते. संत्रीच्या सालांपासून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यानं कोंडा होत नाही.

    बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवत असतील तर संत्रीचे साल खा. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात. संत्रीच्या सालाची पावडर तयार करुन ती गरम पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी प्या. संत्रीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. संत्र्याच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे उत्तम आहे. जर तुम्हाला दात किंवा हिरड्यांशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही संत्र्याचे साल कच्चे खाऊ शकता.

    असे करा सेवन
    तुम्ही संत्रीचे साल चावून खाऊ शकता. जर हे साल चावून खात असताना, या सालीची चव तुम्हाला कडू लागत असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा संत्रीच्या सालाची पावडर आणि मध मिक्स करुन पिऊ शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.