जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निलंबित स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करण्याचे निवेदन आज दि ३ रोजी मुक्ताईनगर बोदवड व रावेर मतदार संघातील आ.चंद्रकांत पाटील व सकल मराठा समाज बांधवानी आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना निवेदन देत तत्कात या अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मराठा समाजाविषयी अतिशय घृणा बाळगून समाजाविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक तसेच संताप जनक वक्तव्य केलेली संभाषण क्लिप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचेवर निलंबनाची कारवाई होऊन त्यांचेवर जळगाव येथे फिर्यादीवरून “दि.१५ सप्टेंबर २०२२” रोजी गुन्हे दाखल देखील झालेले होते. यानंतर त्यांनी मे.जिल्हा सत्र न्यायालय व मे.उच्च न्यायालय, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जामिन मिळणेसाठी याचिका दाखल केली परंतु दोघेही ठिकाणी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. जामीन फेटाळताच सदरील गुन्हेगाराला अटक होणे अपेक्षित होते. जेणेकरून पोलीस प्रशासनाची प्रतिमा यामुळे उंचावली असती मात्र हा घटनाक्रम दोन महिन्यांचा कालावधी पासून सुरु असून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने समाजाने आक्रमक पवित्रा घेत टीक ठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जळगाव येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. परंतु अद्याप पावेतो त्यांना अटक झालेली नसून सदरील समाज कंटक व्यक्तीला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रशासनाचा संताप जनक प्रकार दिसून येत आहे. यामुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.
तरी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य करणारे निलंबित स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले तात्काळ अटकेची कारवाई व्हावी अन्यथा येत्या ८ दिवसांत मराठा समाज रस्त्यावर उतरून मोर्चा मोर्चा सरळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय, जळगाव पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिले आहे. निवेदनावर आ.चंद्रकांत पाटील, आनंदराव देशमुख, नवनीत पाटील, उमेश पाटील, संदीप बागुल, तुषार बोरसे यांच्या स्वाक्षरी आहेत.