चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २३ तरुणीस बोलवून घेत तिच्याशी अंगलट करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय तरुणी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असते. तिला संशयित आरोपी जितेंद्र वामन केदाळे याने शेतात कामासाठी जात असतांना तरुणीचा हात पकडून एका नाल्याजवळ नेत तुला ५०० रुपये देतो तुला मजुरी करिता आणले नाही म्हणत तरुणीशी अंगलट करीत असल्याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलिसात संशयित आरोपी जीतेद्र वामन केंदाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.