लाईव्ह महाराष्ट्र: रेल्वे अडर पासमध्ये पाणी भरल्याने चाळीसगाव तालुक्यातील 7 ते 8 गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .शेतीचे नुकसान झाले त्यासाठी तात्काळ मदत मिळावी अश्या आशयाचे निवेदन कृषी मंत्र्याची गाडी अडवून भाजप कार्यकर्त्यांनी दिले.
रोहिणी रेल्वे अंडर पासमध्ये पाणी तुबल्यामुळे सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसारतील ग्रामस्थना व आजारी पेशन्टना अनेक अडचणी उद्भवत आहे. उपचराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मंत्री मोहदयाना विनंती करण्यात आली व त्यांना रोहिणी रेल्वे गेट जवळ नेऊन त्यांना सद्य परस्थिती दाखवण्यात आली. मंत्री मोहदयानी परस्थिती पाहून तात्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले..तसेच ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जमिनीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव कृष्णातांडा करंजगाव घोडेगाव खराडी पिंपळगाव जुनापाणी राजदेहरे सेटलमेंट तांडा म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी जळगांव जिल्हा सरचिटणीस नितिन भाऊ सोनवणे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते वाल्मिक दादा नागरे, माजी उपसरपंच प्रकाश सगळे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, युवा मोर्चा चिटणीस दीपक घुगे, युवा शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे व इतर शेतकरी बांधव व महिला वर्ग यांनी मंत्री भुसे साहेब यांच्याकडे केली व त्यांनी सरसकट मदत देऊ अशे आश्वासन दिले