जळगाव – आगामी काळातील जळगाव जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने जळगाव ग्रामीणमध्ये पक्ष बळकटीकरणासाठी जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे दौरे सुरु झाले आहे. जळगाव ग्रामीणमधील जळके, विटनेर येथून दौर्यांना सुरुवात झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे बळकटीकरणासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नविन कार्यकर्त्यांच्या जोडणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिपभैय्या पाटील यांच्या आदेशान्वये काँग्रेस कमिटीचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी जळगाव ग्रामीण दौरे सुरु केले आहे. दौर्या दरम्यान जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत असून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जळगाव ग्रामीण येथील जळके, विटनेर तसेच म्हसावद-बोरनार गट पूर्ण झाला असून शनिवार, ७ ऑगस्ट रोजी फैजपूर, नशिराबाद-भादली येथेही दौरा संपन्न झाला.
याप्रसंगी काँग्रेस कमिटी जळगाव ग्रामीणचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष समाधान पाटील, रवि सोनवणे, सोशल मिडीया प्रमुख प्रमोद घुगे, तालुका संघटक भाऊसाहेब सोनवणे, किरण चौधरी, संजय पाटील, रुपचंद कोळी, मुरली सपकाळे आदि उपस्थीत होते.