शहर हद्दीतील जुने जळगाव परिसरातील श्रीकृष्ण नगर, गोपाळ पुरा या परिसरातील नागरिकांच्या वीज बिलासह विविध घरावर धाडी टाकल्याप्रकरणी आज परिसरातील संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष सुरज नारखेडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, श्रीकृष्ण नगर परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये अतिशय क्रूर पद्धतीने घुसून त्यांच्याशी अमानुषपणे वागणूक देण्यात आली त्यात मुखतः परिसरातील प्रत्येकाच्या घरात जाऊन मीटर मध्ये कोणताही दोष नसताना याबाबत त्यानी सक्तीची वसुली यापद्धतीने त्याच्यावर कार्यवाही करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आलेला आहे कारण यामध्ये मुखतः जे पथक यासंदर्भात आलेले होते यांनी हा प्रकार अतिशय चुकीच्या पद्धतीने नागरिकांशी संपर्क साधला त्याचे घरातील विविध सामानाची फेका फेकी केली आणि मीटर मध्ये काही हि आढळून न आल्याने घरातील मीटर काढून कोणतीही पूर्वसूचना न देता याबाबत मीटर त्याच्या अज्ञात स्थळी घेऊन गेले अशे एक ना अनेक घरातील मीटर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेतले त्या मध्ये कोणतेही दोष न आढळून आले असता त्यानी मीटर काढून कोणत्या अज्ञात स्थळी घेऊन गेले हे नागरिकांना सुद्धा समजणे अवघड झाले आहे तरी सदरील बाब हि अतिशय निदनीय कृत्याची आहे मीटर काढून पथकाने याबाबत मीटर मध्ये काही त्रुटी आढळत असेल तर नागरिकाचा समवेत तिथं पंचनामा करणे गरजेचे होते तिथं त्यासंदर्भिय मीटरचे पंचनामे किंवा थर्ड पार्टी परीक्षण तेथे नागरिकांच्या समक्ष करणे गरजेचे होते अशी कोणतीही प्रणाली महावितरने न राबविता डायरेक्ट मीटर काढून याबाबत कार्यवाही नागरिकांच्या समक्ष तपासणी न करता केली आहे याबाबत जागीच पंचनामा करणे गरजेचे होते आजूबाजूतील परिसरातील नागरिकांना तेथ बोलावून संदर्भीय नागरिकाचे मीटर बाबत पंचनामा करणे गरजेचे होते परंतु अशी कोणतीही प्रणाली न वापरता परसातील घरातील मीटर परस्पर काढून नेऊन पंचनामे न करता हा प्रकार या पथकाचा उघडकीस आलेला आहे नागरिकाचे याबाबत मीटर मध्ये कसलीही तफावत आढळून न आल्याने वसुली पोटी या अधिकारी किंवा अदृश्य टोळी अशी कि त्याची स्वतःची ओळख सुद्धा पटवून देण्यात हे अधिकारी असक्षम होते हे मध्यपान अवस्थेत परिसरात घुसून महिलांच्या घरातील बाधरुम मध्ये घुसणे परवानगी न घेता याबाबत निर्लज सारखे घुसून अतिशय चुकीची वागणूक नागरिकांना व महिलांना दिलेली आहे याबाबत शहानिशा होणे अत्यन्त गरजेचे आहे आणि यांच्यावर कार्यवाही होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे एक पथक जे त्याची ओळख पाठवून देण्यास असमर्थ असतील मीटर मध्ये तफावत न आढळून आल्यावर सुद्धा प्रतेकाची मीटर कोणतीही सूचना न देता काढून घेणे हे कोणत्या कायद्यला अनुसरून आहे यामध्ये यापथकाने याना काही आढळून आले असते तर यांनी जागेवरच पंचनामा करणे गरजेचे होते आणि याबाबत थर्ड पार्टी परीक्षण करणे गरजेचे होते आणि हि प्रकरीया नागरिकांच्या समक्ष होणे गरजेचे होते याबाबत कोणताही प्रशासकीय अधिकाऱ्याने पंचनामा करताना एक पोलीस प्रशासन किंवा सभोवताली नागरिक यांच्या उपस्तित मीटर पंचनामा करावा लागतो यामध्ये मोठी तफावत या पथकाच्या टोळी मध्ये आढळून आले मुळात त्यांनी परिसरात वातावरण खराब केले त्यात नागरिकांच्या घरात घुसून त्याच्या महिलांच्या समोर वाथरूम मध्ये घुसणे विविध घरातील सामान अस्ताव्यस्त करणे या अनेक अनिष्ट पद्धतीचे अवलंब करून यांनी कायदा व सुव्यवस्था आपल्या हातात घेऊन कायद्याची पायमल्ली केलेली आहे तरी याबाबत यापथकावर कार्यवाही होनी गरजेचे आहे यांनी याना काही तफावत आढळून येत होती तर जागीच पंचनामे का केले नाही अज्ञात स्थळी नेऊन सुमारे हफ्ता भरानंतर याबाबत कार्यवाही का करण्यात आली यामध्ये नागरिक अतिशय अल्प भूधारक आणि दारिद्र रेषेखालील त्याने प्रामाणिक पणे शासनाकडे वीजबिल भरणे हे चुकिचे आहे काय असा प्रश्न या पथकाच्या वागणुकेचे प्रदर्शन करून त्यानी जो नागरिकांना चुकीच्या वागणूक दिल्या याबाबत खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे लाखो रुपयाची बिले त्याना अधिकारी नि पाठविले यांच उत्पन्न च अल्पभूधारक आहे तर हे एवढे बलाढ्य बिल्ले भरतील कशे मा महोदय याबाबत प्रशासनाने गांभीर्यता घेणे गरजेचे आहे हा प्रकार निंदनीय आणि लोकशाही ला काळिमा फासणारा आहे याबाबत आपण सामन्धीतावर कार्यवाही करणे गरजेचे आहे आणि याना याकार्यवाही बाबत माझ्या समवेत सर्व नागरिकाचा आक्षेप आहे.
हे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष सुरज नारखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदनावर काशिराम बारी, सुपडू बारी, सुरेश बारी, देविदास बारी, लक्ष्मण बारी, अरुण बारी, सौ. सखाबाई बारी, शिवलाल बारी, शंकर बारी, ईश्वर कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.