धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे चांदसर भागातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेबाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दिनांक १ डिसेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 5:15 वाजता मौजे चांदसर-कवठळ रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पथकाने पकडले.
सदर पथकात श्री डी. एस. पाटील, श्री राहूल एस. ढेरंगे, श्री आरीफ शेख, श्री विरेंद्र सोनकांबळे सर्वजण तलाठी यांचा समावेश होता. सदरचे वाहन पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी श्री बुवा साहेब यांनी विशेष सहकार्य केले. सदर टीमची दोन महिन्यातली ही चौथी कारवाई असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.