धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका टायर शॉपीजवळून एक मालवाहू गाडी सह जुने टायर चोरून नेल्या प्रकरणी दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चोपडा रोडवर उमा टायर पंक्चर दुकान हे इम्रान शाह याकुब शाह (वय २६) यांच्या मालकीचे आहे दि ३० रोजी दुपारी दुकानासमोरून एक मालवाहू गाडी क्र.एम.एच.१८.एए.४५५७ हि ४० हजार रुपये किमतीचे व जुने ८ टायर १६ हजार रुपये किमतीचे असे एकूण ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी संशयित आरोपी दिनेश कांतीलाल बडगुजर याच्यासोबत एक इसमाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.