पुन्हा पदभार घेणार, मनपात नाट्यमय घडामोडी
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची शासनाने उचलबांगडी केली होती. त्यांच्या रिक्त जागेवर परभणीचे माजी आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्ती झाली होती. नूतन आयुक्त पवार यांनी बुधवारी पदभारही देखील स्वीकारला आणि आता नाट्यमयरित्या घडामोडी घडून नुतन आयुक्त पवार यांच्या नियुक्तीस स्थगिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड परत जळगाव मनपाचा पदभार घेणार आहे.
जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची दोन दिवसापूर्वी झालेली बदलीची चांगलीच चर्चा आहे. राजकीय वादामुळे ही बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश मंगळवारी २९ नोव्हेंबर रात्री उशिरा काढण्यात आले होते. बुधवारी सकाळी अकराला श्री. पवार यांनी जळगावात दाखल होऊन पदभारही स्वीकारला. डॉ. विद्या गायकवाड पुणे येथे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी गेलेल्या होत्या. त्यांच्या गैरहजेरीत श्री. पवार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. विद्या गायकवाड यांना कोठेही पदनियुक्ती देण्यात आली नाही.
विद्या गायकवाड यांची मॅट मध्ये धाव
विद्या गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आल्याने त्यांनी धाव घेतली. ने केलेल्या अर्जावर मॅट अधिकारी यांनी नुतन आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्तीस स्थगिती देत डॉ. विद्या गायकवाड यांना पदभार देण्याचा निकाल दिला आहे.
पदाधिकाऱ्यांकडून होता विरोध
आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची कामगिरी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जळगाव शहरात गेल्या चार महिन्यापासून विकास होत नाही. अशातच अधिकारी लोकप्रतिनिधींच ऐकत नाहीत अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी लोकप्रतिनिधी करत आहेत. याचबरोबर नुकत्याच झालेल्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजला होता. पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तांच्या बदलीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात होता. मात्र, आता पुन्हा आयुक्तांची बदलीस स्थगिती मिळाल्याने पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला आहे.
अविश्वासाचा ठराव आणण्याची शक्यता?
जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली झाली. आणि पुन्हा त्यांनी मॅट मध्ये धाव घेऊन ही बदली रद्द केली. त्यामुळे आता शहराचे विकासाचे राजकारण आणि ज्या पदाधिकारी यांना जनतेने निवडून दिले त्यांना डावलणे हे कारण, मॅट न्यायालयाने स्थगिती जरी दिली तरी महासभेत अविश्वास ठराव आयुक्त विद्या गायकवाड यांना विरोध करणारे नगरसेवक आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन राज विरूद्ध पदाधिकारी असे चित्र माजी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात दिसले होते. आता पुन्हा हे चित्र महापालिकेत नक्की दिसणार आहे.