Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बंद घर फोडून ६३ हजाराचे दागिने लांबविले
    क्राईम

    बंद घर फोडून ६३ हजाराचे दागिने लांबविले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 11, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून बंद घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे

     
    नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नजरूल इस्लाम खलील अहमद रा. परकोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ते ९ सप्टेंबर रात्री ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून लॉकर तोडून त्यातील सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नजरूल इस्लाम खलील अहमद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.