• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अभिनेता विजय देवरकोंडा ईडीकडून बारा तास चौकशी ; झाला भावूक !

editor desk by editor desk
December 1, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
अभिनेता विजय देवरकोंडा ईडीकडून बारा तास चौकशी ; झाला भावूक !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील राजकारणातील काही नेत्याच्यामागे ईडी कारवाई लागली होती पण नुकतेच प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा देखील ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. त्याची बारा तास चौकशी ईडीकडून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासगळ्या प्रकरणावर विजयनं भावूक होत प्रतिक्रिया दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

असं काय झालं की, लायगर फेम विजय देवरकोंडाला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला होता. त्या चित्रपटावरुनच त्याला ईडीनं ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यात मात्र विजयला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्यानं सांगितले आहे. त्याच्या चाहत्यांना देखील या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. लायगरमध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे होती. लायगरकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

 

आता ईडीनं लायगरशी संबंधित एकेका एका व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. थोड्याच दिवसांनी अनन्या पांडेला देखील नोटीस पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील सुशांत सिंग प्रकरणात अनन्या पांडेला ईडीनं चौकशीसाठी बोलावले होते. लायगरचे निर्माता चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांची देखील चौकशी करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन करन्सी पॉलिसी उल्लंघन (फेमा) केल्याप्रकरणी चित्रपटाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. विजयनं मात्र आपल्याला बारा तास बसवून ठेवल्याचे सांगत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूस्थान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लोकप्रियता वाढली की त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी येतात. मी यासगळ्याकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहतो. हेही दिवस जातील. त्यांनी बोलावलं तेव्हा गेलो. जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली. अशी प्रतिक्रिया विजयनं दिली आहे.

Previous Post

या नियमाने थेट तुमच्या दैनिक आयुष्यात होणार बदल !

Next Post

ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन ; विरोधी पक्षनेते दानवे पोलिसांच्या ताब्यात

Next Post
ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन ; विरोधी पक्षनेते दानवे पोलिसांच्या ताब्यात

ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन ; विरोधी पक्षनेते दानवे पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group