Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मोठी बातमी : ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी !
    राजकारण

    ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मोठी बातमी : ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी !

    editor deskBy editor deskDecember 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. अशातच, यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगील देण्यात आली आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांना माहिती देण्यात आली आहे.

    औरंगाबादमधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असं असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे. अशातच, निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.
    राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.