एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील शेत रस्त्यावरील पाटच्या चारी जवळील कच्च्या रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर खड्डे चूकवीत असताना ट्रॅक्टर ट्रालीसह पाटाचारीत कोसळल्याने त्यात २० वर्षीय योगेश ज्ञानेश्वर सैदाणे (रा.अंबे तालुका शिरपूर) हा ट्रॅक्टरच्या धुड खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ही घटना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १०.१५वाजेच्या सुमारास नागदुली शिवारात निंबा पाटील यांच्या शेताजवळ घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक सह ट्राली मध्ये बसलेले दोन मजूर हे किरकोळ जखमी झाले.
योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या मडगार्ड वर बसला होता. व ट्रॅक्टरचे धूड खाली दाबल्या गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी तपासणीअंती तो मृत झाल्याचे घोषित केले. ट्रॅक्टर चालक रवींद्र कोळी व ट्रॉली मधील उदेश कोळी, खुशाल माळी यांना किरकोळ मार लागल्या असल्याने त्यांना सुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३0 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रवींद्र अभिमान कोळी, योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे, उदेस गोविंदा कोळी ,खूशाल राजू, रवींद्र अभिमान कोळी ते त्यांचे नागदूली शिवारातील शेतातील त्याच्या चारा भरण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ डी व्ही २६७१ घरुन निघाले. रवींद्र अभिमान कोळी हा ट्रॅक्टर चालवीत होता. सुकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्यावर पाटाच्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाले. मृत योगेश सैंदाणे हा नागदूली येथे मामाकडे राहत होता. तो मजूरी चे काम करीत होता. 3या घटनेचे वृत्त समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दीपक शालिक कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर खाटीक ,अकील मुजावर ,राजेश पाटील, मिलिंद कुमावत, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.