जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविद्र पाटील यांच्या मान्यतेने जळगाव महानगर युवतीअध्यक्ष पदावर दीपिका प्रकाश भामरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे पत्र देखील रविद्र पाटील यांनी दीपिकाला दिले आहे.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून दीपिका भामरे हिचे अभिनंदन होत आहे.