जळगाव प्रतिनिधी : राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे ही श्रींची इच्छा आहे गेल्या दोन वर्षाच्या काळात कोणीच सुखी नाही असा टोला आघाडी सरकारला लावत राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा आहे असे ते यावेळी म्हणाले
आज जामनेर येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाल्यानंतर आमदार गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की गणरायाकडे मागणे केले असे नाही मात्र श्री चीच इच्छा आहे की राज्यात भाजपचे सरकार यावे सर्वच घटकांना म्हणजे माध्यमिक,गरीब, श्रीमंत या सर्वांना अपेक्षा आहे या आघाडी सरकारच्या दोन वर्षांची कारकीर्द बघितली असता. या राज्यात कोणीच सुखी नाही. मी फक्त गणरायाला कोरोना बाबत व नैसर्गिक आपत्ती बाबत साकडे घातले आहे सरकार यावे ही गणराया ची इच्छा आहे आणि ती ते पूर्ण करतील अशी आमदार गिरीश महाजन यावेळी म्हणाले, विघ्नहर्ता संकटे दूर करतील पुराणापासून वाचवेल नैसर्गिक आपत्तीपासून वाचतील त्यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना केली आहे
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाणी साठी आले असता आपण पुन्हा एकत्र पाणी केली या प्रश्नावर महाजन म्हणाले की आम्ही सर्व जवळच आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी गुलाबराव जामनेरात येत असल्या मुळे त्यांना म्हटले की तुम्ही घरी या. चाळीसगावला आहे आम्ही सोबतच पाणी केले
नैसर्गिक आपत्ती काळात कोणीही राजकारण आणू नये दुजाभाव न ठेवता एकत्र आले पाहिजे ज्यामुळे जनतेला अधिकाधिक मदत होईल