लाईव्ह महाराष्ट्र न्यूज
जिल्हा दुध संघाची निवडणूक गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवून टाकले होते. त्यावर राजकीय नेते मंडळींनी बऱ्याच टिकाटिपण्णी केल्या पण आज सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या जीआरनुसार जिल्हा दुध संघाची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 09.11.2022 रोजीच्या आदेशान्वये दिनांक 18.11.2022 ते दिनांक 20.12.2022 या कालावधीत राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून, यामध्ये निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी करणे, नामनिर्देशन मागे घेणे. मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक नमूद केला आहे. सदर 7751 ग्रामपंचायतींचा निकाला दिनांक 20.12.2022 रोजी असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 23.12.2022 असा असणे, ज्याअर्थी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्यपरिस्थिती 7147 इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेल्या 7147 सहकारी संस्थांपैकी “अ“ वर्ग, 38 “ब“ वर्ग 1170, “क“ वर्गातील 3151 व “ड“ वर्गातील 2788 सहकारी संस्था असणे, ज्याअर्थी, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असून या वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असणे,त्याअर्थी, राज्यात सद्य:स्थितीत 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा सुरू असलेला कार्यक्रम. त्याचप्रमाणे 7147 सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, वर्ग “क“, “ड“ तसेच, वर्ग “इ“ प्रकारच्या सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी मा. उच्च मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील “अ“ व “ब“ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक 20 डिसेंबर, 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.
ज्या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.