मुंबई : वृत्तसंस्था
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि वंचित एकत्र येणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याच्या भूमिकेमध्ये एकमतावर आले आहेत, आम्ही सकारात्मक आहोत. बोलणी पुढे गेली असून वंचितच्या तीन प्रतिनिधींची सुभाष देसांईंसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. सुभाष देसाई दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांना भेटले आहेत, त्यांच्यात देखील सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात भेटले त्यांच्यामध्ये देखील सकारात्मक चर्चा झाली असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.