Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माझी अवस्था सुशांतसिंहसारखी होऊ शकते ; अभिनेत्याने केला व्हिडीओ व्हायरल
    राष्ट्रीय

    माझी अवस्था सुशांतसिंहसारखी होऊ शकते ; अभिनेत्याने केला व्हिडीओ व्हायरल

    editor deskBy editor deskNovember 29, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बॉलिवूडसारखी भोजपुरी इंडस्ट्रीही बरीच चर्चेत असते. सध्या भोजपुरी सलमान खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. खेसारीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने नाव न घेता पवन सिंहवर आरोप केले आहेत.

    खेसारी लालने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलंय की तो इंडस्ट्रीतील एका व्यक्तीच्या निशाण्यावर आहे आणि बरेच लोक त्याची साथ देत आहेत. माझी अवस्था सुशांत सिंह राजपूतसारखी होऊ शकते, असंही धक्कादायक वक्तव्य त्याने या व्हिडीओत केलं आहे.

    https://www.instagram.com/tv/Clap93IIoYl/?utm_source=ig_web_copy_link

     

    युट्यूबवरून डिलिट झाली खेसारीची गाणी

    खेसारी लालने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत आपलं दु:ख चाहत्यांना सांगितलं. “मी शून्यातून माझ्या करिअरची सुरुवात केली होती, त्यामुळे मला यशाची किंमत माहीत आहे. जसं सुशांत सिंह राजपूतला सर्वांनी मिळून त्रास दिला होता आणि बॉलिवूडमधील काही लोक त्याला बॉयकॉट करत होते. तसाच मलाही त्रास दिला जातोय”, असं तो म्हणाला. यापुढे तो म्हणतो, “माझीही अवस्था सुशांतसारखी केली जातेय. एका व्यक्तीने युट्यूबवरील माझी गाणी डिलिट केली आहेत आणि मला सतत त्रास देतोय. त्याला माझं करिअर संपवायचं आहे.” गेल्या काही दिवसांत खेसारी लाल यादवची बरीच गाणी युट्यूबवरून अचानक डिलिट झाली आहेत. या इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे त्याने नाव न घेता पवन सिंहवर निशाणा साधला आहे. ‘मोठ्या भावासोबत संपूर्ण इंडस्ट्री का असेना, पण हा खेसारी घाबरणारा नाही’, असं त्याने स्पष्ट केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.