Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ५० वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देत करत होता अत्याचार ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    ५० वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देत करत होता अत्याचार ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुण्यातील चार्टर्ड अकाऊंटंट अनिरुद्ध शेठ वर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसेप्शनिस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने अत्याचार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता, असाही त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय महिला सीए असलेल्या अनिरुद्ध शेठ याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर सतत लैंगिक अत्याचार सुरु होता, असा आरोप महिलेने केला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. अनिरुद्ध शेठ महिलेला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भूगावला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. त्यानंतर पेस्ट्री आणि कोल्ड्रिंग दिली. यात गुंगीचं औषध टाकण्यात आलं होतं. गुंगीचं ओषध देऊन महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. या सगळ्याचा त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि हा व्हिडीओ दाखवून महिलेला मानसिक त्रास देत होता आणि व्हायरल करण्याची धमकी देत होता. मार्च 2019 मध्ये हा प्रकार महिलेसोबत घडला होता. या सीएने अनेक बहाण्याने महिलेला बाहेर घेऊन जात त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातच नाही तर बाकी शहरात देखील कामानिमित्त नेत त्यांचा लैंगिक छळ केला. पुण्यातच नाही तर मुंबई आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या त्रासाला आणि धमकीला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार सीएवर गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.