Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्रामीण खेळाडूंनी क्रिकेट जगतात नाव कमवावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    क्रिंडा

    ग्रामीण खेळाडूंनी क्रिकेट जगतात नाव कमवावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव : प्रतिनिधी 
    ग्रामीण खेळाडूंनी क्रिकेटकडे खिलाडू वृत्तीने पाहून खो – खो कबड्डी या खेळाबरोबरच क्रिकेट जगतातही आपले नाव कमवावे व देशाचा अभिमान वाढवावा. त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, क्रिकेटमधील गुण मला राजकारणात कामी आले खेळात आणि राजकारणात कोणाला कसे पाठवायचे हे चांगलेच ठाऊक आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे जय मातादी मित्र मंडळ तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंग केली. मंत्री पाटील यांनी षटकार व चौकार मारल्या नंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. यावेळी युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.*
    मोहाडी येथे जगदीश चव्हाण गणेश राठोड व अनिल पवार यांनी आयोजित क्रिकेट क्लबतर्फे आजपासून क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. आज सकाळी मोहाडी येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते नाणेफेक करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जगदीश चव्हाण,गणेश राठोड, अनिल पवार व सरपंच धनंजय सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत पहिले बक्षीस स्वतः पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जि. प. सदस्य पवन सोनवणे यांच्याकडून रु. ५१ हजार , दुसरे बक्षीस कामिनी हस्पिटलाचे निलेश पाटील यांच्याकडून रु. ३१ हजार पारितोषिके जाहीर केले आहे. या स्पर्धेत मध्यप्रदेशसह धुळे, नाशिक, शिरपूर व जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३२ संघ सहभागी झाले असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
    याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आपल्या आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा, आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.
    यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर आभार सरपंच धनंजय सोनावाने उर्फ़ डंपी यांनी मानले,
    याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, युवासेनेचे आबा माळी, सरपंच धनंजय सोनवणे उर्फ डंपी, ग्रा पं सदस्य सजन राठोड, विजय माळी, सुनिल सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह जिल्हा परिसरातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांना अखेरचा निरोप; बारामतीत जनसागर, अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वावर खळबळ

    January 29, 2026

    शेगाव दर्शनाचा फायदा घेत घरफोडी; जळगावात सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास

    January 29, 2026

    महाराष्ट्र पोरका झाला; अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.