Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुका कबड्डी स्पर्धेत गुड शेपर्ड स्कूल विजयी
    धरणगाव

    धरणगाव तालुका कबड्डी स्पर्धेत गुड शेपर्ड स्कूल विजयी

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या १४ वर्षाआतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तर कबड्डी स्पर्धेत विजय मिळवला आहे. जीपीएस कॅम्पस पाळधी येथे झालेल्या तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षा आतील संघाने अंतिम सामन्यात सर्वज्ञ हायस्कूल बोरखेडा या संघावर विजय मिळवला.

    या सर्व खेळाडूंचा आज शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अमोल सोनार, जगन गावीत, संघ प्रशिक्षक दीपक बयस (माजी विद्यार्थी) यांचा प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचा कर्णधार मेहुल कोठारी, उपकर्णधार मनिष पाटील, खेळाडू भावेश पाटील, आयुष जनकवार, उमन पटेल, विवेक पाटील, अनिकेत माळी दक्ष महाजन, जुएब शेख, क्रिष्णा पवार, सोहम बाविस्कर, दर्शन महाजन या सर्वांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी दर्शना पवार लिखित न्याय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
    शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, जगन गावीत, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावीत, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद इंद्रसिंग पावरा आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.