Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवी अशा लोकांना बळ देणार नाही ; ठाकरेंचा हल्लाबोल
    राजकारण

    देवी अशा लोकांना बळ देणार नाही ; ठाकरेंचा हल्लाबोल

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहेत, कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे गट गुवाहाटीहून परतताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

    तसेच, हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असे ताशेरेही ठाकरेंनी ओढले आहे.

    ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. यात ठाकरेंनी म्हटले आहे की, ठाकरेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक प्रश्नांचे थैमान सुरू आहे. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर व सांगलीतील ‘जत’वर दावा सांगून खळबळ उडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर घाणेरडय़ा पद्धतीने चिखलफेक सुरू असल्याने राज्याची जनता संतप्त आहे. असे सगळे घडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री त्यांच्या गटाच्या तीसेक आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले. मुंबईतून विमाने भरभरून माणसे नेली व तेथे नवस फेडले. पण दुसऱया दिवशी परत मुंबईकडे येताना त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती.

    ठाकरे म्हणाले, अशी आख्यायिका आहे की, कामाख्या देवीच्या मंदिरात ‘बळी’ प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. (खरे खोटे 40 खोके आमदारांनाच माहीत) महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बकऱयांचा बळी दिला जातो व त्या अंधश्रद्धेस सगळय़ांचा विरोध आहे, पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही.

    ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते. मिंधे गटाचे आमदार म्हणतात, ‘देवीच्या दर्शनावरून खिल्ली उडवाल तर तुमच्यावर कोप होईल. देवीचा नवस फेडायला आम्ही आलोय’, मात्र हे साफ खोटे आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवस वगैरे करण्याचा या लोकांना अधिकार नाही.

    #cmshinde #shivsena #udhavthakare
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आता माघार नाहीच : बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम !

    October 29, 2025

    मतदार संघात जाऊन काम करा ; अजित पवारांची आमदारांना तंबी !

    October 29, 2025

    खळबळजनक : अमळनेरच्या तरुणाचा मृतदेह चंद्रपुर जिल्ह्यात आढळला !

    October 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.