मुंबई : वृत्तसंस्था
दोन दिवसांचा गुवाहटी दौऱ्यावर शिंदे गटा असतांना आज त्यांचा दौरा मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खोक्यांच्या मुद्द्यावरुनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं.
उद्धव ठाकरेंनी कालच्या बुलडाण्यातील सभेत शिंदे गटातील आमदारांना रेडे, खोके सरकार… असं संबोधल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव घेता टीका केली. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्येतून ते हे बोलत आहेत. सरकारबद्दल लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं शिंदे म्हणाले.
आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. सगळ्यांना समाधान आणि आनंद वाटला. काल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचं जंगी स्वागत केलं. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही सोबत होते. जिथे आम्ही थांबलो तिथे मुख्यमंत्रीही आले होते. त्यांनी स्नेहभोजन दिल्याचं शिंदेंनी सांगितलं.
खोक्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना उत्तर देतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेलं आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना दिला.