Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राणेंवर अंधारे आक्रमक ; काढले संस्कार !
    राजकारण

    राणेंवर अंधारे आक्रमक ; काढले संस्कार !

    editor deskBy editor deskNovember 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे प्रचंड संतापल्या असून त्यांनी थेट निलेश राणे आणि नितेश राणे यांचे संस्कारच काढले आहेत.

    सुषमा अंधारे या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राणे कुटुंबावर हल्ला चढवला. आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

    सुषमा अंधारे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरहील जोरदार हल्ला चढवला. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहेत. ते गृहमंत्र्यासारखे वागत नाहीत. एकाच पक्षाचे असल्या सारखे वागतात. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही, असा आरोप त्यांनी केला. सगळी खाते फडणवीस यांच्याकडे आहेत. याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होत आहे. या मागणीला त्यांनी विरोध केला. काही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहेत. त्यांची मागणी पूर्ण होणार नाही. ही भाजपची पिलावळ आहे, अशी टीका त्यांनी केली.

    #ranefamili
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.