जळगाव ;- जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठातापदी शल्य तज्ञ डॉ.महेश चौधरी यांची निवड झाली असून त्याबद्दल नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डी.एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी डॉ.महेश चौधरी यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून डॉ.चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.