• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सरकारची जीभ दिल्लीला गहान ठेवलीय का? राऊत यांचा सवाल !

editor desk by editor desk
November 26, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारची जीभ दिल्लीला गहान ठेवलीय का? राऊत यांचा सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था 

या सरकारची जीभ दिल्लीला गहान ठेवलीय का? एवढच मला विचारायचंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. आज सकाळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

राज्यात सध्या संतप्त वातावरण आहे. अशा स्थितीत सरकार आहे कुठं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार गप्प. आता भाजपचे प्रचारक रामदेवबाबांनी महिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे, तरी सरकार गप्प आहे.

आज आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बुलढाण्याला जात आहोत. आजची बुलढाण्यातील सभा ही ऐतिहासीक होणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे अनेक विषयावरती आपल्या भूमिका व्यक्त करतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्याने केलेलं वक्तव्य असेल, या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल असेही संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा वीरपुरुष दिला त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमित आजची जाहीर सभा होत आहे. त्या भूमित निष्ठा आणि इमान याचंच बीज रोवलं गेलं आहे. इथं बेईमानी करणाऱ्याला लोक अजिबात थारा देणार नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. या पवित्र भूमित आज विराट सभा होत असल्याचे राऊत म्हणाले.

रामदेवबाबा यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. ज्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील तिथे उपस्थित होत्या. त्या कशा गप्प बसल्या? असा सवाल राऊतांनी केला. असं वक्तव्य करणारा कोणाही, कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे असेही राऊत म्हणाले. एकिकडे तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याचवेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा महिलांचा अपमान करतो, तरीही सरकार गप्प असल्याचे राऊत म्हणाले.

Previous Post

रामदेव बाबांचे उदगार आक्षेपार्ह नाही ; आ.रवी राणा

Next Post

मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

Next Post
मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीत दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group