लाईव्ह महाराष्ट्र: रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी गावातील तरुणांनीव शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहभागी झाले होते.
रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे 8रोजी श्रीराम साप्ताहिक मिलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहिरवाडी याच्या तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यातील डेंग्यू रोगाच्या साथीला आवश्यक असलेल्या रक्ताच्या विविध घटकांसाठी ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे;त्यात कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने रक्त तुटवडा भरपूर प्रमाणात आहे,या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिरवाडी येथील सिद्धेश चौधरी,शुभम वैद्य, सुमित महाजन, पंकज महाजन, शुभम शिंदे,सागर पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिर ठरविले व फक्त एक दिवसाच्या नियोजनात तब्बल 54 रक्तदात्यांनी रक्तदान करून सर्वांसमोर एक आदर्श उभा केला. या शिबिराला विशेष करून सर्व शेतकरी बंधू यांनी रक्तदान केले; म्हणूनच रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास बळीराजा रक्तदान शिबिर असे नाव देण्यात आले होते शिबिराच्या यशस्वितेसाठी गावातील सहकारी दूध डेरी कार्यालय वापरण्यात आले गावातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय मंडळी ज्येष्ठ मंडळी इत्यादींनी सक्रिय सहभाग नोंदविला आणि *केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित, माधवराव गोलवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र रक्त दान केले,