मुंबई : वृत्तसंस्था
ठाण्यात झालेल्या एका महिलांच्या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा यांच्या कथित वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. दरम्यान, येथे उपस्थित असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी रामदेवबाबांच्या वक्तव्याचा बचाव केला आहे. रामदेवबाबा जे काही बोलले ते मी व्यवस्थित ऐकले आहे. त्यात महिलांचा अवमान होईल, असे काहीही नव्हते.
“माझ्यासारखा आपण (महिला) काहीही परिधान केले नाही तरीही चांगले दिसतात!” रामदेवबाबांच्या या क्तव्यावरून शुक्रवारी वाद झाला होता. रामदेव बाबांचे हे विधान आक्षेपार्ह नाही का?, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रवी राणा म्हणाले की, रामदेवबाबांचे ते वाक्य आपण विचार करू त्या अर्थाचे ठरू शकते. रामदेव बाबांना म्हणायचे होते की, स्त्रिया हे आई, बहीण आणि देवीचे रूप आहे. रामदेवबाबांच्या विधानाबाबत जे कुणी चुकीचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ते आक्षेपार्ह असू शकते.
आमदार रवी राणा म्हणाले, तो महिलांचा मेळावा होता. योगगुरू रामदेवबाबा नेहमीच महिलांचा आदर करतात. त्यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. रामदेवबाबांनी या वेळी बोलताना सकारात्मक दृष्टिकोनातून अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. रवी राणा यांनी सांगितले, बाबांनी उलट सभेत महिलांसाठी गौरवास्पद भावनेतून शब्द वापरले. कोणतेही चुकीचे शब्द वापरले नाहीत. जे त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावत आहेत.