Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदेंची भाषणे स्क्रिप्ट आहे ; राऊत आक्रमक
    राजकारण

    मुख्यमंत्री शिंदेंची भाषणे स्क्रिप्ट आहे ; राऊत आक्रमक

    editor deskBy editor deskNovember 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे विद्यमान सरकारविरोधात प्रचंड संतापाची लाट आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे. भाजपचे मुख्यमंत्री भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा करणं शक्य आहे का? ही सगळी स्क्रिप्ट आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मलाही भविष्य कळतं, पुढच्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही, असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय, मी याला युद्ध म्हणतो, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सुरु केलाय, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांवर चिखलफेक केली.
    त्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच बोम्मईंना पुढे केलंय, लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय, असा दावा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. उत्तर प्रदेश, गुजरात इथं असं पाहायला मिळतं का? यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर, किंवा गुजरातच्या सीएमनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कधी हल्ला केलाय का? हा अत्यंत शिस्त पाळणारा पक्ष आहे. हे सारं नियोजितपणे सुरु आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, राज्यापालांनी मराठी माणसाचा अपमान केला, गुजराती, मारवाडी मुद्यावरून तो मागे टाकायला मला अटक केली, असं राऊत म्हणाले.

    तुम्ही कितीही कारस्थानं केलीत तरी राज्याची जनता विसरणार नाही महाराष्ट्राची एक इंच भूमीही जाऊ देणार नाही. सरकार दुबळंय, पण शिवसेना नाही, टाका तुरूंगात आम्ही भित नाही. राज्याचा या खोके सरकारवर विश्वास नाही यांना खोके दिले की सारं विसरतात. मात्र उद्धव ठाकरेंनी याविरोधात आता रणशिंग फुंकलंय आणि हा लढा फार मोठ्या स्तरापर्यंत जाणार आहे, असंही संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं. गुवाहाटीला जाऊदेत किंवा लंकेत ४० आमदारांचे लोकांमधून नामोनिशाण नाहीसे झाले आहे. दोन महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही मलाही कुंडली बघता येते, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना तंत्रमंत्र करायचेत, भविष्य पाहायचेत त्यांनी पाहून घ्या त्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, हे स्पष्ट होतं, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.