• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

डेंग्यूच्यापासून मुक्त होण्यासाठी हे उपाय करा !

editor desk by editor desk
November 24, 2022
in आरोग्य
0
डेंग्यूच्यापासून मुक्त होण्यासाठी हे उपाय करा !

सध्या देशासह राज्यातील विविध भागात डेंग्यूचा आजार मोठ्या झपाट्याने पसरत असून त्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो. असा ताप आल्यास रुग्णाला चांगली विश्रांती घेण्यास सांगितले जाते. तसेच लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशी अनेक सुपरफ्रुट्स आहेत, जी खाल्याने रुग्णाला या आजाराशी लढण्याची ताकद मिळते, तसेच रिकव्हरीचा वेगही वाढतो.

1) किवी
डेंग्यू झालेला असताना किवी खाल्याने चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले कॉपर, हे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि संसर्गापासून संरक्षण करते. किवी हे फळ पोटॅशिअम, व्हिटॅमिन -ई आणि व्हिटॅमिन -ए यांचा समृद्ध स्त्रोत आहे. जे शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते. किवीमध्ये व्हिटॅमिन-सी देखील असते, जे डेंग्यूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती देते.

2) डाळिंब
डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. ते निरोगी ब्लड प्लेटलेट्सची संख्या अथवा प्रमाण राखण्यास मदत करते, जे डेंग्यूतून बरे होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जाणवणारी थकवा आणि अशक्तपणाची समस्या डाळिंबाचे सेवन केल्याने दूर होते.

3) मालटा
डेंग्यूच्या रुग्णांसाठी लिंबूवर्गीय अथवा सिटरस फळे नेहमीच फायदेशीर मानली जातात. माल्टामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. डेंग्यूमध्ये अनेकदा रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यावेळी माल्टा उपयोगी ठरू शकते. माल्टा शरीराला हायड्रेटेड ठेवते, अशक्तपणाशी लढा देण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

4) पपई
पपई हे पाचक एंजाइम्स, पपेन आणि कायमोपैन यांचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे पचनास मदत होते, जळजळ किंवा सूज रोखली जाते आणि पचनासंबंधी इतर समस्यांवर उपचार करण्यास मदत होते. डेंग्यूशी लढा द्यायचा असेल तर पपजईच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या पानांचा 30 मिली रस प्यायल्यास प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होते.

5) नारळ पाणी
नारळाचे पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. त्यामध्ये असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक ताकद देतात. त्याची मिनरल्स आणि मीठ यामुळे शरीराचा डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो. डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो, अशा वेळी नारळ पाण्याचे सेवन उपयुक्त ठरते.

6) ड्रॅगन फ्रूट
हे फळ अँटिऑक्सिडेंट्स, हाय फायबर आणि लोह, तसेच व्हिटॅमिन-सी यांचा समृद्ध स्त्रोत आहे. ड्रॅग फ्रूटच्या सेवनाने रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डेंग्यूच्या तापापासून त्यांचे संरक्षण होते. डेंग्यूच्या तापामुळे अनेकदा हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, अशा वेळी ड्रॅगन फ्रूट हे हाडांची ताकद आणि हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते.

7) केळं
केळं हे एक असे फळ आहे जे पचण्यास अत्यंत सोपे आहे. डेंग्यूतून लवकर बरे होण्यासाठी रुग्णाला पचायला सोपे , पोषक तत्वं असलेले पदार्थ व संतुलित आहार सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी पोटॅशिअम, व्हिटॅमिन-बी-6 आणि व्हिटॅमिन-सी यांनी परिपूर्ण असलेले केळे खावे. ते आजाराशी लढण्यातही मदत करते.

Previous Post

गाडीत बसवून त्याला ४ मुलीनी दारू पाजून केला अत्याचार !

Next Post

रात्री सोशल मीडियावर स्टेटस अन तरुणाचा आढळला संशयास्पद मृतदेह !

Next Post
रात्री सोशल मीडियावर स्टेटस अन तरुणाचा आढळला संशयास्पद मृतदेह !

रात्री सोशल मीडियावर स्टेटस अन तरुणाचा आढळला संशयास्पद मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group