धरणगाव : प्रतिनिधी
कब चौ. उमावि जळगाव व एरंगेल विभाग किडा समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा (मुले व मुली) कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे २० रोजी संपन्न झाली.
यात एरंडोल विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला सदर स्पर्धत विजयी संघ / महाविद्यालय प्रथम क्रमांक कला वाणिज्य विज्ञान महाविदयालय धरणगाव (मुले संघ) व उपविजेता किसान महाविदयालय पारोळा तृतीय त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालय पाळधी तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव मुली संघ विजयी तर कै.म.धु.पाटील कला महाविद्यालय मारवड उपविजयी सदर स्पर्धेच्या उद्घाटनास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मेजर, मेजर डॉ. ए. डी. वळवीसर उद्घाटक म्हणून लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल क्रिडा विभागाचे सचिव प्रा.डॉ.देवदत्त पाटील मारवाड, प्रा.डॉ.शैलेष पायल प्रा डॉ.व्हि.के पाटील, तर स्पर्धेचे पंच म्हणून प्रा.डॉ.तेजस शर्मा, प्रा. डॉ.हर्षोसरदार प्रा.मनोज पाटील, प्रा.डॉ. सौ. हर्षदा पाटील, प्रा.डॉ. लिंबाजी प्रताडे (नॅशनल बॉक्सींग पंच) म्हणून लाभले. स्पर्धा पार पाडण्यास महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा.दिपक पाटील, प्रा.जितेंद्र ओस्तवाल, प्रा.अमित पाटील माजी विद्यापिठ खेळाडू संकेत चंदेल, गुणवंत पवार, व जिमखाना विभागाच्या सर्व खेळाडू यांनी आयोजन केले.