जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागातून २१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिन्यासह इतर वस्तूंची चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परीसातील हुडको येथील रहिवासी आशा रतनलाल जैन(वय ६०) या मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, दि ९ ते १३ रोजी दरम्यान अनोळखी इसमाने जैन यांच्या मालकीच्या १० ग्राम सोन्याची चैन, १ हजार रुपये किमतीचे सिलेडर यासह स्टीलची शेगडी घेत चोरी केली आहे. या प्रकरणी जैन यांनी रामानंद पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय सपकाळे हे करीत आहेत.