Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शरद कोळी यांना जामीन मंजूर !
    क्राईम

    मोठी बातमी : शरद कोळी यांना जामीन मंजूर !

    editor deskBy editor deskNovember 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शिंदे गटातील मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात येवून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी धरणगावात दाखल गुन्ह्यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना जळगाव न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

    काही दिवसांपूर्वी धरणगावात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा पार पडली. यात युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात टिका केली होती. यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांचा अवमान केल्यासह गुजर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून धरणगाव पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार भादंवि कलम-२९५ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना यानंतर भाषण करण्यासाठी बंदी लादण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद कोळी हे पोलीसांच्या हाती लागले नव्हते. यानंतर त्यांनी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सोमवारी सुनावणी झाली. यात त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.