मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे.
ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी या याचिकेतुन गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी केली आहे. ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी. आता त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे याचा हिशोब लागत नाही असा आरोप भिडे यांनी केला आहे. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली आहे.