पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावाच्या शेत शिवारातील घरातून चोरी करीत ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील उंदीरखेडा येथील शेत शिवारातील ४१२ मधील एका घरातून दि २० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतातील दुवारसिंग काशीराम पावरा (वय ३५) यांच्या घरातील लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करीत घरातील ५० हजार रुपये रोकड व १५ हजार रुपयांची चांदीचा कमरेचा पट्टा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजू जाधव हे करीत आहेत.