• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माझी औकात येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल ; मोदींनी विरोधकांना फटकारले !

editor desk by editor desk
November 21, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
माझी औकात येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल ; मोदींनी विरोधकांना फटकारले !

मुंबई : वृत्तसंस्था 

देशातील गुजरातमध्ये निवडणुकीचे पडघम वाजायची सुरुवात झाली असून याठिकाणी भाजपसह कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने कंबर कसली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले – ‘मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?’ मिस्त्रींनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा केली होती.

पीएम मोदी म्हणाले, ”काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही माझी औकात दाखवा. मी सेवादार आहे. सेवादाराची औकात नसते. तुम्ही मला नीच म्हणा. खालच्या जातीचा म्हणा. माझा मृत्यूचा व्यापारी म्हणून उल्लेख करा. माझी कोणतीच औकात नाही. पण कृपा करा विकासाच्या मुद्यावर बोला. विकसित गुजरात बनवण्यासाठी मैदानात या. औकातीचा खेळ सोडा.”

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या भारत जोडो यात्रेवरही निशाणा साधला. ते म्हणाले – सत्तेतून बेदखल झालेल्या लोकांना यात्रेच्या माध्यमातून पुनरागमन करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावरून राहुलवर निशाणा साधला. काँग्रेस नेते नर्मदा प्रकल्पाला 3 दशकांपर्यंत बंद ठेवणाऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढत आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी मोदींचा घरोघरी व वृद्धांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा नवा अंदाज पहावयास मिळाला. सभा संपल्यानंतर मोदींनी लोकांना घरातील वृद्धांना आपण आठवण काढल्याचे सांगण्याचे आवाहन केले. हे आवाहन त्यांनी रविवारी धोराजीच्या सभेतही केले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र भाईंनी मोडावा अशी इच्छाही व्यक्त केली.

Previous Post

भाजप ‘तिथे’ आंदोलन का करत नाही ? सुषमा अंधारेंनी केला सवाल !

Next Post

धक्कादायक : परिवारातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात आढळले मृतदेह !

Next Post
धक्कादायक : परिवारातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात आढळले मृतदेह !

धक्कादायक : परिवारातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात आढळले मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्या धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत !
Uncategorized

उद्या धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group