जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगर परीसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना दि २० रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी नयन पाटील हे करीत आहेत.