• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यासह जिल्ह्यात थंडीचा गारठा वाढला !

editor desk by editor desk
November 21, 2022
in आरोग्य
0
राज्यासह जिल्ह्यात थंडीचा गारठा वाढला !

नाशिक : वृत्तसंस्था 

राज्यात गेल्या काही दिवसापासून बोचरी थंडी होती मात्र कालपासून उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आेझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे. सातारा जिल्ह्यात थंडी वाढली असून महाबळेश्वर-पाचगणी येथे पारा घसरला आहे.

वेण्णालेक परिसरात रविवारी सकाळी तापमान एकदम घटले. सकाळी थंडी, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत पर्यटकांनी बाजारात खरेदीचा आनंद लुटला. डिसेंबर महिन्यात पाचगणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच त्या परिसरातच समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली किनाऱ्याकडे अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यात पाऊस पडेल.

Previous Post

जळगावात राष्ट्रवादीने केला राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ते त्रिवेदी यांचा निषेध !

Next Post

पुण्यात मोठा अपघात एका ट्रकने दिली ४८ वाहनांना धडक; २० जखमी !

Next Post
पुण्यात मोठा अपघात एका ट्रकने दिली ४८ वाहनांना धडक; २० जखमी !

पुण्यात मोठा अपघात एका ट्रकने दिली ४८ वाहनांना धडक; २० जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group