जळगाव : प्रतिनिधी
भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत” आणि भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 5 वेळा माफीनामे लिहुन दिले” असे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे व आक्षेपार्ह , संतापजनक बेताल वक्तव्य केलेले आहे .
या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तर्फे तिव्र आंदोलन करून निषेध करण्यात आला . आंदोलनादरम्यान भगवान सोनवणे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कोषारी यांची वेशभूषा करत डोक्यावरची काळी टोपी काढुन त्यातून कांदे बटाटे खाली पडल्यावर , कोषारी यांचे डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला . तसेच ” मी म्हातारा झालो असल्याने मला उमजत नाही म्हणूनच मी असे बेताल वक्तव्य करतो ” असे बोलून प्रतिकात्मक रित्या निषेध व्यक्त केला . कोषारी व त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला व दोन्हींच्या फोटोला चपला व जोडे मारुन , त्रिवेदी यांचा पुतळा जाळण्यात आला .
सदर आंदोलनात महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल , युवक अध्यक्ष रिकू चौधरी , अमोल कोल्हे , मझहर पठाण , किरण राजपूत , सुशील शिंदे , इब्राहिम तडवी , शालिनी सोनवणे , मिनाक्षी चव्हाण , रमेश बहारे , जितेंद्र बागरे , राहुल टोके , हितेश जावळे , रफिक पटेल , नरेश शिंदे , किरण चव्हाण , खलित शेख , हरुण शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते